Pune Crime News
Pune Crime Newsesakal

Crime News : नागपूरमध्ये पोलिस कर्मचाऱ्याने डोक्यात गोळी झाडून घेत जीवन संपवलं

Published on

पुणेः नागपूरमध्ये पोलिस कर्मचाऱ्याने जीवन संपवल्याची घटना घडली आहे. पुण्यामध्येही शुक्रवारी अशीच घटना घडली होती.

नागपूरमधील यूओटीसी कॅम्प परिसरामधील पोलिस कर्मचारी मंगेश मस्के, एसआरपीएफ यांनी शनिवारी ड्युटीवर असताना डोक्यात गोळी झाडून जीवन संपवलं. पुणे आणि नागपूरमध्ये दोन दिवसात दोन घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

पुण्यातील घटना

शुक्रवारी पुण्यामध्ये खडक पोलिस ठाण्यांतर्गत लोहियानगर चौकीत पोलिस कर्मचाऱ्याने कार्बाइनमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. हा प्रकार शुक्रवारी (ता. ५) सकाळी उघडकीस आला.

Pune Crime News
Eknath Shinde : ''आता त्याग पुरे झाला, मित्रपक्षांना आणखी जागा सोडू नका..'', मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत पदाधिकारी आक्रमक

भारत दत्ता आस्मर (वय ३४) असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. आस्मर हे लोहियानगर पोलिस चौकीत रात्रपाळी कर्तव्यावर होते. पोलिस चौकीतील विश्रांती कक्षात शुक्रवारी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास आस्मर यांनी कार्बाइनमधून स्वतःवर चार गोळ्या झाडून आत्महत्या केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com