Crime News : ‘पुष्पा’ स्टाइलमध्ये सागवान चोरी; पण महिला वनपरिश्रेत्र अधिकारी निघाली ‘फायर’

पुष्पा चित्रपट आठवतो? चित्रपटाचा हिरो पुष्पा हा रक्तचंदनाच्या तस्करीसाठी विविध मार्ग वापरतो. त्याच्या हुशारीपुढे अनेकदा पोलिसही कमी पडतात.
teak theft
teak theftsakal

नागपूर - पुष्पा चित्रपट आठवतो? चित्रपटाचा हिरो पुष्पा हा रक्तचंदनाच्या तस्करीसाठी विविध मार्ग वापरतो. त्याच्या हुशारीपुढे अनेकदा पोलिसही कमी पडतात. नागपूर वन विभागात मात्र याच्या अगदी उलट घडले. सागवानाची तस्करी करणाऱ्या सात जणांसह ट्रक आणि चंदनाची लाकडे पारडी क्षेत्रातील वन कर्मचाऱ्यांनी पहाटेच ताब्यात घेतली.

सेमिनरी वन परिक्षेत्रात येणाऱ्या पारडी परिक्षेत्रात वन विभागाचे कर्मचारी सोमवारी सकाळी गस्तीवर असताना वाहनाच्या उजेडात एका ट्रकमध्ये लाकडे भरली जात असल्याचे त्यांना दिसले. वन कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने छापा टाकला असता लाकडे भरणारे मजूर आणि ट्रक चालक फरार झाले.

दरम्यान, संपूर्ण परिसराची तपासणी करीत पोलिसांनी झुडपांत लपलेल्या सात आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता लाकडाची तस्करी करणाऱ्या सूत्रधाराचे नाव मात्र समोर आलेले नाही. वन विभागाकडून लाकूड तस्कराचा शोध युद्धपातळीवर घेतला जात आहे. तस्करी करणाऱ्यांकडून ४३ लाकडाचे गोळे आणि २२ फाटे जप्त करण्यात आले.

कारवाई उपवनसंरक्षक डॉ. भरतसिंह हाडा, सहाय्यक वनसंरक्षक विजय गंगावने यांच्या मार्गदर्शनात वन परिक्षेत्र अधिकारी सारिका वैरागडे, जीवन पवार, अमोल गिरी, ए.जी. चौरागडे, समीर नेवारे, धनविजय, राघोर्ते, भस्मे यांनी कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com