
नागपूर : मत्स्य उद्योगमंत्री नितेश राणे वादग्रस्त वक्तव्य करून महाराष्ट्राला बरबाद करीत आहेत. आपण या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहोत. वादग्रस्त व सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांना अनेक नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी बाजूला सारले आहे. या यादीत लवकरच राणे दिसतील असा दावा महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना केला. त्यांना अल्पसंख्याक आयोगाकडून नोटीस पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.