PM Narendra Modi | मोदींबद्दल अश्लाघ्य भाषेत विधान; काँग्रेस नेत्याविरोधात गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

मोदींबद्दल अश्लाघ्य भाषेत विधान; काँग्रेस नेत्याविरोधात गुन्हा दाखल

पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केल्याप्रकरणी नागपुरात एका काँग्रेस नेत्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यामुळे काँग्रेस नेते शेख हुसेन हे अडचणीत आले असून त्यांच्याविरोधात कलम २९४ (अश्लिल कृत्य आणि गाणी) तसंच ५०४ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमानजनक टिप्पणी करणे) या कलमांतर्गत गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. (FIR against Maharashtra Congress leader for derogatory remarks about PM Modi)

हेही वाचा: राहुल गांधींची तिसऱ्या दिवशीही ईडी चौकशी; काँग्रेसचं दिल्लीत हिंसक आंदोलन

शेख हुसेन हे नागपूर काँग्रेसचे (Nagpur Congress) माजी अध्यक्ष आहेत. राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांच्या ईडी चौकशीवरुन सध्या काँग्रेस आक्रमक झाली आहे. या आंदोलनात सहभागी झालेले असताना शेख हुसेन यांनी पंतप्रधान मोदींवर (PM Narendra Modi) आक्षेपार्ह शब्दांत टिप्पणी केली. त्यामुळे नागपूर भाजपाने तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा: जब-जब मोदी डरते हैं... म्हणत काँग्रेस नेत्याचा मोदींवर हल्लाबोल

दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणात (National Herald Money Laundering case) ईडी कारवाई करण्यात आली आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी राहुल गांधींची चौकशी सुरू आहे. त्यामुळे देशभरात काँग्रेस आक्रमक झाली आहे. देशभरात विविध ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत.

Web Title: Rahul Gandhi Ed Congress Leader In Nagpur Sheikh Hussain

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top