नॅशनल हेराल्ड प्रकरण : ED कडून सोनिया गांधी यांना पुन्हा समन्स

national herald case ed summons congress interim president sonia gandhi
national herald case ed summons congress interim president sonia gandhi

नॅशनल हेराल्ड प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने (ED) काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना पुन्हा समन्स बजावले आहे. आता ईडीने त्यांना 23 जून रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर सोनिया गांधी यांनी ईडीसमोर हजर राहण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ मागितला होता. यापूर्वी, ईडीने 8 जून रोजी सोनिया गांधींना चौकशीसाठी बोलावले होते, परंतु त्यापूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. (national herald case ed summons congress interim president sonia gandhi)

दरम्यान याच प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनाही समन्स बजावले होते. तपास यंत्रणेने १३ जून रोजी राहुल गांधींना चौकशीसाठी बोलावले आहे. समन्स बजावल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारवर सरकारी यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता.

national herald case ed summons congress interim president sonia gandhi
कर्नाटकातून भाजपसाठी आनंदाची बातमी; तीन जागांवर विजय

काँग्रेस पक्ष शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत

१३ जूनला राहुल गांधींच्या चौकशीच्या दिवशीही काँग्रेस पक्ष शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसचे सरचिटणीस आणि संघटना प्रभारी के.सी. वेणुगोपाल यांनी गुरुवारी AICC सरचिटणीस, राज्य प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. बैठकीत १३ जूनच्या तयारीवर चर्चा करण्यात आली.

दिल्लीसह देशभरातील ईडी कार्यालयांसमोर सत्याग्रह करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. यासह पक्षाने दिल्लीतील ईडी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पक्षाने यापूर्वीच सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदार, काँग्रेस कार्यकारिणी सदस्य आणि प्रदेश प्रभारींना १३ जून रोजी सकाळी ९.३० वाजेपर्यंत पक्ष कार्यालयात पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत.

national herald case ed summons congress interim president sonia gandhi
कर्नाटकातून भाजपसाठी आनंदाची बातमी; तीन जागांवर विजय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com