

राहुल गांधी व्होट चोरीच्या मुद्यावर निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप करत आहेत. काल बुधवारी राहुल गांधी यांनी हरियाणा निवडणुकीतील मोठे आरोप केले. यावेळी त्यांनी दुबार मतदारांचे पुरावेही दिले. विदेशातील मतदारही मतदार यादीत आहेत. मात्र नावे वेगळी असल्याने हा मोठा स्कॅम असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. मात्र आता काँग्रेस आमदाराचीच डबल नोंदणी असल्याची माहिती समोर आली आहे.