Anil Deshmukh: निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज द्यावे: अनिल देशमुख; 'राहुल गांधींनी उपस्थित केलेले प्रश्न योग्यच'
Nagpur News : पाच वर्षांत कधी मतदार वाढले नाही तेवढे पाच महिन्यात कसे वाढले, अशी विचारणा त्यांनी केली आहे. यापूर्वी उमेदवाराने मागणी केल्यास सीसीटीव्ही फुटेज देण्याची तरतूद होती. ती काढून टाकल्याने शंकेला वाव आहे.
नागपूर : निवडणूक प्रक्रियेतून सरन्यायाधीशांना बाजूला का केले, उमेदवाराला सीसीटीव्हीचे फुटेज देण्याची तरतूद का काढून टाकली, अशी विचारणा निवडणूक आयोगाला करून काहीतरी गडबड असल्याची शंका माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.