esakal | फोरलेन ढाब्याच्या हुक्का पार्लरवर धाड; मालकासह चौघांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

A raid on a hookah parlor in Forlane Dhaba

वेगवेगळ्या टेबलवर ग्राहक दारू आणि हुक्का पीत होते. पोलिसांना पाहताच ग्राहकांनी अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला. ढाब्याचे संचालकही पसार होण्याच्या तयारीत होते. मात्र, पोलिसांनी त्यांना पकडले. झडतीमध्ये बिअरची कॅन, दारूच्या बॉटल, हुक्का पॉट आणि फ्लेव्हरसह २.३५ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

फोरलेन ढाब्याच्या हुक्का पार्लरवर धाड; मालकासह चौघांना अटक

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : गुन्हे शाखेचे डीसीपी गजानन राजमाने यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर युनिट चारच्या पथकाने शनिवारी रात्री जबळपूर महामार्गावरील फोरलेन ढाब्यावर धाड टाकली. यावेळी ग्राहक दारू आणि हुक्क्याचे सेवन करताना आढळले. पोलिसांना पाहताच ग्राहक व ढाबा संचालकामध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांनी ढाबा मालकासह चार आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेतील आरोपींमध्ये ढाबा संचालक देशपांडे ले-आऊट निवासी रशीद मोहम्मद शेख (२७), आरिफ मोहम्मद शेख (२८), इमरान मोहम्मद रफीक शेख आणि व्यवस्थापक कार्तिक अरविंद पिटलवाड (२३) यांचा समावेश आहे. डीसीपी गजानन राजमाने यांना माहिती मिळाली होती की, वाठोडा रिंग रोडवरील फोरलेन ढाब्यामध्ये हुक्का पार्लर सुरू आहे. त्यांनी युनिट चारला कारवाईचे आदेश दिले. रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास पोलिसांनी ढाब्यावर धाड टाकली.

अधिक वाचा - बाल्या बिनेकर हत्याकांड : सहाव्या आरोपीला अटक, सामाजिक कार्यकर्त्यांचाही समावेश असल्याची चर्चा

वेगवेगळ्या टेबलवर ग्राहक दारू आणि हुक्का पीत होते. पोलिसांना पाहताच ग्राहकांनी अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला. ढाब्याचे संचालकही पसार होण्याच्या तयारीत होते. मात्र, पोलिसांनी त्यांना पकडले. झडतीमध्ये बिअरची कॅन, दारूच्या बॉटल, हुक्का पॉट आणि फ्लेव्हरसह २.३५ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम, सपोनि किरण चौगुले, दिलीप चंदन, पोउपनि राजकुमार त्रिपाठी, हेमंत थोरात, पोहवा शंकर शुक्ला, राजकुमार, अजय, प्रशांत, बबन, आशीष, सतीश, विनोद, मृदुल, अभिषेक, श्रीकांत, अविनाश, आशीष, विकास आणि संदीप यांनी केली. राज्य उत्पादन विभागाचे निरीक्षक एस.टी.दळवी आणि त्यांच्या पथकानेही कारवाईत सहकार्य केले.

संपादन - नीलेश डाखोरे

loading image
go to top