नागपूर : गुंगीचे औषध देऊन प्रवाशांची लुट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Railway Station News

Nagpur News : गुंगीचे औषध देऊन प्रवाशांची लुट

नागपूर : रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी खाद्य पदार्थात गुंगीचे औषध देऊन प्रवाशांना लुटणाऱ्या केरळ टोळीच्या एका सदस्याला मोठ्या शिताफीने नागपूर स्थानकावर अटक केली. चुमन कुमार शाह (२४) रा. चंपारण, बिहार असे अटकेतील आरोपीचे नाव आहेत. त्याच्या जवळून पोलिसांनी एक पावडर जप्त केला आहे.

आरोपी चुमनची एक टोळी आहे. ते वेगवेगळ्या प्रांतात रेल्वेने प्रवास करतात. प्रवासादरम्यान बाजुला बसलेल्या प्रवाशांसोबत लाडीगोडीने गप्पा करतात. त्यांचा विश्वास जिंकून त्या प्रवाशांना खाण्यापिण्याच्या वस्तुतून बेमालूमपणे विषाक्त पदार्थ (पावडर) खाऊ घालतात. प्रवासी बेशुद्ध पडल्यानंतर त्याचे पैसे आणि मौल्यवान वस्तू घेऊन पुढच्या स्टेशनवर उतरून जातात. ही केरळची टोळी असून रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना टोळीतील एका सदस्याला अटक करण्यात यश आले.

प्रवाशांना गुंगीचे औषधी देणारा मोरक्या केरळचा आहे. त्याच्या टोळीत तीन सदस्य आहेत. चुमन कुमार हा टाइल्सच काम करतो. याकामासोबतच ही टोळी रेल्वे प्रवाशांशी ओळख आणि मैत्री करते. खाद्य पदार्थात गुंगीचे औषधी देवून लुटपाट करते. अशा अनेक घटना यशवंतपूर ते गोरखपूर मार्गावर घडल्या. यासोबतच हावडा मार्गावरही अशा घटना उघडकीस आल्या. लुटपाटीच्या अनेक तक्रारी त्रिवेंद्रम (केरळ) पोलिसाकडे आहे. स्थानिक पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत आरोपी चुमन कुमारचे छायाचित्र आरपीएफ निरीक्षक आर.एल. मीना यांना व्हॉट्स ॲपवर पाठविले.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळला चोरटा

आरोपी चुमन यशवंतपूर गोरखपूर एक्स्प्रेसने प्रवास करीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज वरून लक्षात आले. ही माहिती मिळताच मीना यांच्या पथकाने सेवाग्रामपासून गाडीची झाडाझडती घेतली. नागपूर रेल्वे स्थानकावर गाडी थांबताच गाडीचा ताबा घेतला आणि प्रत्येक डब्याची तपासणी केली. यावेळी चुमन कुमार हा जनरल डब्यात आढळला. खात्री केल्यानंतर पथकाने त्याला उतरवून ठाण्यात आणले. सखोल चौकशी केली. कायदेशीर कारवाईनंतर स्थानिक पोलिसांच्या सुपूर्द केले. ही कारवाई मध्य रेल्वेचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडेय यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे निरीक्षक एन.पी.सिंह यांच्या पथकाने केली.

Web Title: Railway Passengers Robbery Drug Medicine Kerala Gang Member Arrested Nagpur Station

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..