esakal | रेल्वे स्थानकावरील मुक्काम चोरट्याला पडला महागात
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वे स्थानकावरील  मुक्काम चोरट्याला पडला महागात

रेल्वे स्थानकावरील मुक्काम चोरट्याला पडला महागात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : रेल्वेतून महागडा मोबाईल चोरल्यानंतर पळून न जाता नागपूर रेल्वेस्थानकावरच (mobile theft) मुक्काम ठोकला. मनातील हीच इच्छा त्याला चांगलीच महागात पडली आणि गजाआड (accused arrested) जावे लागले. कृष्णकुमार हरीलाल (२०, रा. जदासुरंग, मोगेला, डिंडोरी, मध्यप्रदेश) असे चोरट्याचे नाव आहे. (Railway-police-arrest-mobile-theft-accused)

भीलाई येथील रहिवासी तोशिबा साहू या ०२४४१ बिलासपूर-नवी दिल्ली स्पेशल ट्रेनमधून प्रवास करीत होत्या. ही गाडी सोमवारी रात्री नागपूर स्थनकावर थांबली असता त्यांच्याकडील ४२ हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. गाडी सुरू होताच मोबाईल चोरीची बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी गाडीत गस्त घालणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना घटनेची माहिती दिली. त्यांच्याकडून लेखी तक्रार घेत जवानांनी नागपूर ठाण्याचे निरीक्षक आर. एल. मीना यांना माहिती दिली.

त्यांनी लगेच कर्मचाऱ्यांना सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीचे आणि चोरट्याचा शोध घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार उपनिरीक्षक सचिन दलाल, देवेंद्र पाटील, नितीन देवरे, टोपराम रहांगडाले, नवीन कुमार आदींनी फुटेडच्या तपासणीसोबतच रेल्वेस्थानकाच्या परिसरात संशयास्पद अवस्थेत वावरणाऱ्यांची चौकशी सुरू केली.

हेही वाचा: नागपूरच्या भावेशची ‘इंडिया बुक’मध्ये नोंद; चतुष्कोन पूर्ण

तिकडे मोबाईल चोरीनंतर कृष्णकुमार पळून न जाता रेल्वेस्थानकावरच थांबला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या. छायाचित्रावरून त्याचा शोध सुरू करण्यात आला. अल्पवधीतच तो रेल्वेस्थानकाच्या आवारात वावरताना दिसला. त्याला ठाण्यात आणून चौकसी केली अतसा चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीचा मोबाईलही जप्त करण्यात आला. पुढील कायदेशीर कारवाईसाठी हे प्रकरण लोहमार्ग पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.

(Railway-police-arrest-mobile-theft-accused)

loading image