
नागपूर : यावर्षी मॉन्सून पंधरा दिवस लवकर येऊनही वरुणराजा जूनमध्ये पाहिजे तसा बरसला नाही. मात्र, जुलै महिन्यात सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने बॅकलॉग भरून निघाला असून, अमरावती वगळता विदर्भातील सर्व जिल्ह्यांनी सरासरी गाठली आहे. ऑगस्टमध्ये दरवर्षीच्या तुलनेत कमी पावसाची शक्यता असल्याने बळिराजाची चिंताही वाढणार आहे.