CM Devendra Fadnavis: महायुती एकत्र लढेल आणि जिंकेलही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
Maharashtra Politics: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर विविध राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती अभेद्य असल्याचे सांगून विरोधकांवर शेरोद्वारे टीका केली.
नागपूर : मनसे नेते राज ठाकरे यांनी भेट घेतल्यानंतर विविध चर्चा रंगल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलताना, लोकांनी भ्रमित होण्याचे कारण नाही, महायुती अभेद्य आहे. महायुतीमध्येच निवडणूक लढू.