CM Devendra Fadnavis: महाराष्ट्राच्या मनात काय, ते...दिसेल; ठाकरे बंधूंच्या भेटीवर फडणवीसांचे सूचक विधान
Raj Thackeray And UddhavThackeray : मातोश्री येथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची झालेली भेट ही महाराष्ट्राच्या राजकारणात नवे संकेत देते आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट उत्तर टाळत अप्रत्यक्ष भाष्य केले.
नागपूर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे चुलत बंधू आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ''मातोश्री'' निवासस्थानी घेतलेली भेट सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे.