Ramdas Athawale
esakal
रामदास आठवले यांनी नक्षलवाद्यांना रिपाइंकडून निवडणूक लढवण्याचे आवाहन केले.
संविधानाचा मार्ग स्वीकारणाऱ्यांचे स्वागत करण्याची घोषणा केली.
राष्ट्रीय अधिवेशन ८ मार्च रोजी नागपूर येथे होणार आहे.
नागपूर : हिंसेचा मार्ग सोडून संविधानाचा मार्ग स्वीकारणाऱ्या नक्षलवाद्यांना राजकारणात येण्यासाठी प्रोत्साहन देत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी त्यांना रिपब्लिकन पक्ष (RPI) कडून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली. नागपूर दौऱ्यावर आले असता गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.