esakal | भाजप खासदाराचा कौटुंबिक वाद राष्ट्रवादीच्या दरबारात; वाचा पूर्ण प्रकरण
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप खासदाराचा कौटुंबिक वाद राष्ट्रवादीच्या दरबारात

भाजप खासदाराचा कौटुंबिक वाद राष्ट्रवादीच्या दरबारात

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेने तडस कुटुंबाकडून मारहाण व अत्याचार होत असल्याचा आरोप केला आहे. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. तडस यांच्या सुनेने मदतीची विनंती केल्याचे चाकणकर यांनी म्हटले आहे. यामुळे हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे.

याअगोदर तडस यांच्या सुनेने मुलगा पंकज तडस याच्याविरोधात लैंगिक छळ केल्याची तक्रार नागपुरातील पोलिस महानिरीक्षकांकडे केली होती. या तक्रारीमुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ माजली होती. पोलिस महानिरीक्षकांकडे दिलेल्या तक्रारीत खासदार रामदास तडस, त्यांची पत्नी शोभा तडस, मुलगी सुनीता तडस यांच्या नावाचाही उल्लेख केला होता.

हेही वाचा: देशमुख यांना हटविण्यासाठी मोर्चेबांधणी; नागपुरात हालचाली

आता सुनेने चक्क व्हिडिओ व्हायरल केला आहे. पूजा तडस यांचा व्हिडिओ रूपाली चाकणकर यांनी ट्विट केला आहे. यात ‘मी पूजा, रूपालीताई चाकणकर यांच्याकडे मदत मागतेय. माझ्या जिवाला धोका आहे इथे, प्लीज मॅडम मला इथून घेऊन चला. मी रिक्वेस्ट करते’, असे म्हणत आहे. यावर चाकणकर म्हणतात, खासदार रामदास तडस कुटुंब हे सुनेला मारहाण करून अत्याचार करीत आहे. पूजाचा व्हिडिओ माझ्यापर्यंत आला आहे. तातडीने पोलिस आयुक्तांशी संपर्क साधला असून, पदाधिकारी व पोलिस संरक्षणासाठी पोहोचले आहे.

मुलगा पंकज आणि पूजाचे लग्न झाले आहे. लग्नाच्या सहा महिन्यांनंतर दोघेही वर्धेत राहू लागले. काही काळानंतर पूजा माझ्या घरी राहायला आली. त्यांच्यात भांडण झाले होते. भांडण सुरू असताना मी वर्धेला होतो. घरून फोन येताच तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी भांडण सोडवले. मी वर्धेतून घरी पोहोचलो. तोपर्यंत पंकज वर्धेला निघून गेला होता. त्यानंतर पूजा माझ्याजवळ दोन महिने राहिले. परंतु, तिला म्हटले नाही पंकजकडे वर्धेला जा, अशी प्रतिक्रिया एका वृत्तवाहिनीला रामदास तडस यांनी दिली.

loading image
go to top