

Car Accident
sakal
रामटेक : भरधाव क्रेटा कारने धडक दिल्याने कामावर जाणाऱ्या दोन शेतमजूर महिलांचा मृत्यू झाला. ही घटना नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वर कांद्री माइनजवळ शनिवारी (ता.२२) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संतप्त जमावाने रास्ता रोको आंदोलन करीत महामार्गावरील वाहतूक रोखून धरली.