Nagpur News : नागपूर शहरात आढळली दुर्मीळ पाल

पिपळा रस्त्यावर ‘गिरी गेकोयेला’ (Cyrtodactylus varadgirii) या दुर्मीळ प्रजातीची पाल आज आढळली.
Cyrtodactylus varadgirii
Cyrtodactylus varadgiriisakal

नागपूर - पिपळा रस्त्यावर ‘गिरी गेकोयेला’ (Cyrtodactylus varadgirii) या दुर्मीळ प्रजातीची पाल आज आढळली. तिला वर्ष २०१६ मध्ये सरपटणाऱ्या प्राण्याचे अभ्यासक वरद गिरी यांनी शोधल्याने ती त्याच्या नावाने ओळखली जाऊ लागली. तत्पूर्वी ती नाव ‘कोलेगल गेको’ या नावाने होती. तिला त्याच अधिवासात ठेवण्यात आले.

अत्यंत सुंदर व आकर्षक दिसणारी ही पाल घोणस सापाप्रमाणे दिसते. बहुतांश नागरिक तिला विषारी पाल म्हणतात. मात्र ही पाल विषारी नाही. तरीही या पालीला जीव गमवावा लागतो. पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी पाल आहे.

या पालीच्या अस्तित्वाला सध्याच्या शहरीकरण आणि विकासामुळे धोका निर्माण झालेला आहे. सोमवारी सांयकाळी सात वाजता पिपळा फाटावरील आऊटरवरुन जात असलेल्या एका व्यक्तीचा वाइल्ड लाइफ वेल्फेअर सोसायटीचे सदस्य गौरंग वाईकर यांना फोन आला की, अजगारासारख्या सापाचे पिल्लू दिसत आहे. माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले.

गौरंग आणि नितीश भांदककर घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्याची पाहणी केली. तेव्हा ती पाल असल्याचे लक्षात आले. गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाचे संरक्षक दीपक सावंत यांना त्या पालीबद्धल विचारणा केली. तेव्हा त्यांनी ही पाल दुर्मीळ असल्याचे सांगितले. त्याला वरद गिरी यांनीही दुजोरा दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com