

Family Relieved After Rare Heart Defect Uncovered and Cured at 70
Sakal
वानाडोंगरी : सावनेर येथील ७० वर्षीय एका वृद्ध महिलेच्या छातीत उठलेली तीव्र वेदना आणि धाप लागलेला श्वास, त्यांच्या कुटुंबासाठी काळजाचा ठोका चुकवणारा क्षण ठरला. जीव मुठीत धरून त्यांना लता मंगेशकर हॉस्पिटल, हिंगणा रोड, नागपूर येथे दाखल करण्यात आले. तपासणीदरम्यान उघड झालेले सत्य केवळ गंभीरच नव्हे, तर विलक्षण होते. त्या आजींचे हृदय आयुष्यभर डावीकडे नव्हे, तर उजव्या बाजूला धडधडत होते.