खबरदार! रॅश ड्रायव्हिंग कराल तर; २८ हजार लायसन्स रद्द

खबरदार! रॅश ड्रायव्हिंग कराल तर; २८ हजार लायसन्स रद्द

नागपूर : जानेवारी ते जून या सहा महिन्यांत उपराजधानीत सर्वाधिक ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यात आल्या आहेत. गेल्या सहा महिन्यांत शहरात राज्यात सर्वाधिक २८ हजार ३६ ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. धूमस्टाईलने सुसाट वाहन चालविणाऱ्यांवर आरटीओकडून चाप लावले जात असताना ड्रायव्हिंग लायसन रद्द करण्यात राज्यात नागपूर विभाग टॉपवर आहे. मुंबई विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी वेगाने वाहने चालवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यात राज्यातील ४० हजार ३०५ चालकांची ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाकडे पाठवला आहे. गेल्यावर्षी १७ हजार ९४४ चालकाची ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले होते. राज्यात वाहन चालक वाहतुकीचे नियम मोडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने राज्यातील नियम मोडणाऱ्या १४ लाख ७५ हजार १०१ चालकांवर कारवाई केली.

खबरदार! रॅश ड्रायव्हिंग कराल तर; २८ हजार लायसन्स रद्द
चोराची शक्कल! सीसीटीव्हाला पेंट मारून मंदिराची दानपेटी फोडली

यातील ४० हजार ३०५ चालकांनी नियमांचे वारंवार उल्लंघन केल्याने त्यांची ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्यासाठीचा प्रस्ताव परिवहन विभागाला पाठवण्यात आला आहे. क्षमतेहून अधिक मालाची वाहतूक, मालवाहू गाड्यांमधून प्रवासी वाहतूक, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

७ महिन्यात ३०० ठार

भरधाव वाहनांवर नियंत्रण न मिळविल्यामुळे गेल्या सात महिन्यात रस्ते अपघातात ३०० जणांचे प्राण गेले आहे. यामध्ये सर्वाधिक युवा वर्गाचा समावेश आहे. वेगाने वाहन चालविल्यामुळे सर्वाधिक अपघातात घडले आहे. होणारे रस्ते अपघात आणि वाहनांची स्पीड लक्षात घेता आरटीओ विभागाने थेट लायसन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, हे विशेष.

खबरदार! रॅश ड्रायव्हिंग कराल तर; २८ हजार लायसन्स रद्द
पती म्हणाला, माझ्याकडून मुलं होऊ शकत नाही; परपुरुषासोबत संबंध ठेव

दृष्टिक्षेपात

  • विभाग - एकूण कारवाई संख्या - रद्द ड्रायव्हिंग लायसन्स

  • नागपूर शहर- ७१६९० - २८०३६

  • मुंबई शहर- २६५९८५ - ३१४९

  • हायवे पोलिस- ६३३०५१ - २९१८

  • नवी मुंबई- ६१३८० - २१३३

  • ठाणे शहर- ४५५२२ - ५०६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com