Nagpur University: नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा अखेर रद्द; सुधारित तारखा जाहीर

नवे वेळापत्रकाचीही घोषणा, परीक्षेसाठी दिला होता पंधरा दिवसांचा कालावधी
Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University
Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur Universityesakal

Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १५ मे पासून सुरू होणाऱ्या अंतिम वर्षाच्या पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांच्या परीक्षा अखेर रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. याविरोधात विद्यार्थी आणि संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.

विद्यापीठाद्वारे पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करीत, १५ मे पासून उन्हाळी परीक्षा सुरू करण्याची घोषणा केली होती.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार वेळापत्रक काढताना विद्यार्थ्यांना एका महिन्याआधी कळवावे लागते. मात्र, विद्यापीठाने परीक्षेच्या अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी वेळापत्रक काढून विद्यार्थ्यांना धक्का दिला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur Universityfinal year exams finally cancelled Revised dates announced)

Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University
सोलापूर जिल्ह्यात १० वर्षांनी सुरु होणार टॅंकर! उजनी मायनस ०.७० टक्के; सोलापूरसाठी १० मेपासून पाणी

तसेच विद्यार्थी संघटनांनीही निवेदन सादर करीत, विद्यार्थ्यांची बाजू मांडली. शनिवारी (ता.६) परीक्षा विभागाने त्याची दखल घेत, १५ मे पासून सुरू होणारी अंतिम वर्षाच्या पदवी आणि पदविका अभ्यासक्रम तर २२ मे पासून सुरू होणाऱ्या अंतिम वर्षाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

अशा आहेत सुधारित तारखा

या परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेत स्थळावर जाहीर करण्यात आले असून १५ तारखेच्या परीक्षा २२ मे तर २२ च्या परीक्षा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार आहे.

Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University
Uddhav Thackeray : "भाजपबद्दल मला आदर होता कारण..."; उद्धव ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'

अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना दिलासा

विशेष म्हणजे, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट, असाईमेंट, प्रॅक्टीकल यासारख्या बाबी पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे त्यासाठी त्यांना किमान एका महिन्याच्या कालावधी देणे आवश्‍यक असते. मात्र, विद्यापीठाने तो न देता, केवळ पंधरा दिवस दिले. त्यातून हा घोळ झाल्याचे दिसते. आता या निर्णयाने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

‘यिन’च्या निवेदनाला यश

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने उन्हाळी परीक्षा वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले. मात्र, ते वेळापत्रक नियमानुसार नसल्याने विद्यार्थ्यांवर मानसिक ताण व त्यांच्यात प्रचंड अस्वस्थता होती. त्यातून ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन)चे महाविद्यालयीन उपाध्यक्ष आयुष शर्मा आणि यिन सदस्यांनी कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांची भेट घेत विषय समजवून सांगितला. त्यातून कुलगुरूंनी मागणी मान्य करीत, वेळापत्रक रद्द केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com