Nagpur : रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur : रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण

Nagpur : रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठांमध्ये प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आलेली नसल्याचे चित्र आहे. सरकारकडून ३० टक्के जागा कपातीसह मागविण्यात आलेल्या सुधारित आकृतीबंधानुसार एकट्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात हजारावर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येतो आहे. राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये गेल्या चार वर्षांपासून प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या

रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण

भरतीला विराम लागलेला आहे. बहुतांश विभागात सातत्याने प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती यामुळे बऱ्याच विद्यापीठांमध्ये रिक्त जागांचे संकट उभे राहीले आहेत. त्यावरुन अकृषी विद्यापीठांच्या सुधारित आराखडा तयार करण्याचे आदेश राज्याचे उच्चशिक्षण विभागाकडून देण्यात आले होते. विद्यापीठाकडून हा सुधारित आराखडा तयार करण्यात आला. नागपूर विद्यापीठातील जुन्या आराखड्यानुसार प्राध्यापकांचे ३३४ तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ८६४ पदे मंजूर करण्यात आली होती. सध्या जुन्या आकृतीबंधानुसार विद्यापीठात प्राध्यापकांची १६० तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ४८४ पदे रिक्‍त आहेत. राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने जुन्या आकृतीबंधानुसार प्राध्यापकांच्या ५१९ आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या १ हजार १०५ पदांचा समावेश होता. आता नव्या आकृतीबंधानुसार प्राध्यापकांची १२९ तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे २८३ वाढीव पदांचा समावेश आहे. एकत्रितपणे विचार केल्यास रिक्तपदांची संख्या १ हजार ५६ एवढी होताना दिसून येते.

मात्र, सरकारकडून रिक्त पदे भरण्यासंदर्भात अद्याप कुठलेही धोरण निश्‍चित झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे येत्या काही महिन्यात रिक्त पदे भरल्या जातील ही शंका कमीच असल्याचे दिसते. त्यामुळे याचा फटका मूल्यांकनाला बसणार असल्याचे दिसून येते.

‘सकाळ’ची भूमिका

गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने रिक्त पदाचा अनुशेष कायम आहे. त्यामुळे एकीकडे विभागाच्या कामावर परिणाम होत आहे. दुसरीकडे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढतो आहे. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठातील प्राध्यापकांसह कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांना मंजुरी देण्याची गरज आहे.

  • जुनी मंजूर पदे - प्राध्यापक -३३४- शिक्षकेतर कर्मचारी - ८६४

  • रिक्‍त पदे - प्राध्यापक - १६० - शिक्षकेतर कर्मचारी - ४८४

  • नव्या आराखड्यानुसार वाढीव पदे - प्राध्यापक - १२९ - शिक्षकेतर कर्मचारी - २८३

  • एकूण रिक्त पदे - १,०५६

loading image
go to top