esakal | गृहिणींनो, तळणाचे पदार्थ करताना हात आवरा; तेलाचे भाव भिडले गगनाला; लिटरमागे इतकी वाढ 
sakal

बोलून बातमी शोधा

लॉकडाउनचा फटका बसल्यानंतर त्यातून हळूहळू परिस्थिती सामान्य होत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यात इंधन दरवाढीचा फटकाही नागरिकांना बसत आहे. लॉकडाउनचा फटका बसल्यानंतर त्यातून हळूहळू परिस्थिती सामान्य होत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाने डोके

लॉकडाउनचा फटका बसल्यानंतर त्यातून हळूहळू परिस्थिती सामान्य होत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यात इंधन दरवाढीचा फटकाही नागरिकांना बसत आहे.

गृहिणींनो, तळणाचे पदार्थ करताना हात आवरा; तेलाचे भाव भिडले गगनाला; लिटरमागे इतकी वाढ 

sakal_logo
By
राजेश रामपूरकर

नागपूर ः एकीकडे पेट्रोल, डिझेलची दरवाढ कायम असतानाच दुसरीकडे खाद्य तेलासह हरभरा, तूर डाळीचे भावही सतत वाढू लागले आहेत. गेल्या दोन महिन्यांत शेंगदाणा, सोयाबीनसह पामतेलाचे भाव हे लिटरमागे ७ ते १५ रुपयांनी वाढले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे आधीच सर्वसामान्य नागरिक त्रस्त असतानाच आता महागाईचा फटकाही सहन करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

लॉकडाउनचा फटका बसल्यानंतर त्यातून हळूहळू परिस्थिती सामान्य होत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यात इंधन दरवाढीचा फटकाही नागरिकांना बसत आहे. स्वयंपाकघरात रोज लागणारे खाद्यतेलाचे भावही काही महिन्यांपासून चढेच असल्याने नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. सोयाबीन तेलाचे भाव कडाडले असून, २००० रुपये प्रति १५ किलो असलेले सोयाबीन तेल आता २१०० ते २१५० रुपयांवर तर शेंगदाणा तेलही २३०० ते २४०० रुपयांवर गेले आहे. दोन महिन्यांपूर्वी १५० रुपये प्रति लिटर या भावाने मिळणाऱ्या शेंगदाणा तेलासाठी सध्या १६४ रुपये मोजावे लागत आहेत.

 हेही वाचा - बाबाऽऽ बाबा! असे स्वतःचे आयुष्य संपवू नका; फेसबुक लाइव्ह करीत आत्महत्येचा प्रयत्न

पालकमंत्री नितीन राऊत यांनी १५ ते २१ मार्चदरम्यान लॉकडाउन जाहीर केल्याने गेल्या आठवड्यात बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढली होती. तुरीचे उत्पादन कमी असल्याने तूरडाळीच्या दरात सलग दुसऱ्या आठवड्यातही वाढ झालेली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात ९५ रुपये किलो असलेली तूरडाळ आता १०२ रुपयांवर पोहोचली आहे. होळी पंधरा दिवसांवर आली असून बाजारात हरभरा डाळीची मागणी वाढल्याने प्रति किलो दोन रुपयांची वाढ झालेली आहे, असे नागपूर किरकोळ व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.

राज्यात खरीप हंगामात तुरीच्या रब्बी मोसमात हरभरा, मूग, उडदाचे उत्पादन चांगले झालेले आहे. राज्याच्या कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून २०२०-२१ मध्ये महाराष्ट्र डाळीचे एकूण ४३,३० लाख टनापर्यंत उत्पादन होणार आहे. खरिपाच्या मोसमात १७.५४ लाख टन तर रब्बीच्या मोसमात २५ ते २६ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा - साहेबऽऽ कोरोनामुळे नंतर मृत्यू येईल; भुकेमुळे आधीच...

खरिपामध्ये तूरडाळीचे उत्पादन ११.७८ लाख टन, २.२७ लाख टन मूग आणि ३.९० लाख टन उडीद तर रब्बीच्या मोसमात हरभरा २४.६७ लाख टन, उडीद २.५८ लाख टन तर मूग २.२७ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील काही भागांत पावसाने हजेरी लावल्याने हरभऱ्याच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचेही त्यांनी सांगितले. 

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image