अ‌ॅपवरून ऑनलाइन कर्जाचा फास! प्ले स्टोअरवरून उडवले ३० अ‌ॅप, पण तुमच्या मोबाईलमध्ये तर नाही ना?

RBI and cyber police remove cyber fraud app from play store
RBI and cyber police remove cyber fraud app from play store

नागपूर : त्वरित ऑनलाइन कर्ज उपलब्ध असून केवळ एक अ‌ॅप डाऊनलोड करा आणि मालामाल व्हा... असे मॅसेज किंवा फोनवरून माहिती देत जाळ्यात ओढण्याचा फंडा सायबर गुन्हेगारांनी लावला होता. मोबाईल अ‌ॅप डाऊनलोड करताच आपल्या खात्यातून बरीच रक्कम परस्पर लंपास केली जात होती. ही बाब लक्षात घेता आरबीआय आणि सायबर पोलिसांनी ताबडतोब हालचाली करीत तब्बल ३० अ‌ॅपवर बंदी घातली आहे. 

मोबाईल हाताळताना अनेक जाहिराती मोबाईलवर येतात. त्यात 'त्वरित कर्ज पाहिजे..नो डॉक्युमेंट...१५ मिनिटात कर्ज आपल्या खात्यात..'असा उल्लेख असतो. कर्जाची गरज असलेले अनेक जण त्यावर क्लिक करतात. मात्र, हे सर्व सायबर गुन्हेगाराचे जाळे असते. हे गुन्हेगार ग्राहकांना हेरल्यानंतर पॅन कार्ड, कोणत्या खात्यात पैसे क्रेडिट करायचे आहे, खाते क्रमांक आणि नोंदणी शुल्क म्हणून ५०० ते १००० रुपये अशी माहिती देतात. तसेच कर्ज देण्यासाठी अनेक नवीन अ‍ॅप बाजारात आले. यामध्ये लवकर कर्ज मिळवण्यासाठी आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर इत्यादी माहिती दिली असता लगेच कर्ज मिळते. पण नंतर या अ‍ॅपद्वारे गंडा घालून खात्यातून पैसे परस्पर उडविल्या गेल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. 

१३८ नागपूरकरांना गंडविले - 
आतापर्यंत राज्यात ५० हजारहून अधिक लोकांची तब्बल एकूण १८ कोटींची फसवणूक झाली आहे. तर नागपुरातही १३८ जणांना ऑनलाइन कर्जाच्या नावावर फसवले असून एकूण ५२ लाखांनी गंडा घातला आहे. अ‌ॅप डाऊनलोड करताच सायबर क्रिमिनल्स मोबाईलमधून बॅंकेचा डाटा चोरतात. तसेच फोन करून ओटीपी मागवून कर्जाच्या नावावर गंडा घालतात. 

थोडा विचार करा..! 
कर्ज घेताना बँकेत गेल्यास बरीच मोठी प्रक्रिया पार पाडावी लागते. तर मग मोबाईलवरील अ‌ॅप एवढ्या सहजासहजी लाखांचे कर्ज कसे मिळवून देतील. त्यामुळे आमिषाला बळी पडू नका. अन्यथा डोक्याला हात लावायची वेळ येईल. 

मोबाईलवरून किंवा थेट खात्यात कर्ज उपलब्ध करून देण्याचा फंडा सायबर गुन्हेगार वापरत आहेत. अशा मॅसेज, कॉल आणि जाहिरातीकडे दुर्लक्ष करा. जर कुणी बळी पडून फसवणूक झाल्यास लगेच सायबर पोलिसांकडे तक्रार करा. 
- केशव वाघ, सहायक पोलिस निरीक्षक, सायबर क्राईम 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com