esakal | कन्हान रुग्ण मृत्यूप्रकरण: आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत, जबाबदारी घेणार कोण? संतप्त कुटुंबीयांचा प्रश्न

बोलून बातमी शोधा

hospital
कन्हान रुग्ण मृत्यूप्रकरण: आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत, जबाबदारी घेणार कोण? संतप्त कुटुंबीयांचा प्रश्न
sakal_logo
By
सतीश घारड

टेकाडी (जि. नागपूर) : नाशिक येथील रुग्णालयाबाहेर मृत नातेवाईकांचा आक्रोशाचा आवाज हृदय पिळवटून टाकणारा होता. अशावेळी बाधित कुटुंबांना सावरायचं कसं? त्यांच्या डोळ्यांमधील अश्रू पुसायचे कसे? हा प्रश्न अनेकांसमोर निर्माण झाला होता. असाच प्रश्न जिल्ह्यातील कांद्री स्थित जवाहरलाल नेहरू रुग्णालयात देखील १३ एप्रिलला घडलेल्या दुर्घटनेनंतर उभा ठाकला आहे.

हेही वाचा: धक्कादायक! ऑक्सिजन मास्क फेकून कोरोनाग्रस्ताचं रुग्णालयातून पलायन; परिसरात कोरोना संसर्गाची भीती

ऑक्सिजनअभावी की प्रशासनाची घोळ चुक असल्यामुळे कन्हानच्या निरअपराध पाच रुग्णांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना घडली. अशात नाशिक येथील २४ रुग्णांना तत्काळ प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली, मग आमच्या मृत रुग्णांची जबाबदारी घेणार कोण ? आम्हाला न्याय हवा, असा संतप्त सवाल कुटुंबीयांनी केला आहे.

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे येथील वैद्यकीय उपचार यंत्रणा कमी पडत आहे. नागपूर येथील शासकीय आणि खासगी रुग्णालय ‘फुल्ल’ असल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांचा ऑक्सिजनअभावी गुदमरून मृत्यू होत असल्याचे चित्र आहे. त्यांचे प्राण वाचवावे म्हणून जिल्ह्यातील कांद्री स्थित जवाहरलाल नेहरू रुग्णालयात कोविड केंद्र सुरू करण्यात आले होते.

मात्र १३ एप्रिल रोजी ऑक्सिजन पातळी कमी मिळाल्याअभावी अमित दिनदयाल भारद्वाज (३१, पटेलनगर, कन्हान), कल्पना अनिल कडू (३८), किरण राधेश्याम बोराडे (४७, टेकाडी), हुकुमचंद पी.येरपुडे (५७, रायनगर कन्हान), नमिता श्रीकांत मानकर (३३, रायनगर कन्हान) या पाच निष्पाप जिवांना आपले प्राण गमवावे लागले होते. घटनेच्या नऊ दिवसानंतरही कुठलीही शासकीय मदत पीडित कुटुबीयांना मिळाली नाही. त्यातच नाशिक येथे मृत पावलेल्यांना नाशिक महानगर पालिकेने जबाबदारी घेत तत्काळ पाच लाखांची मदत कुटुंबीयांना घोषित केली, पण जवाहरलाल नेहरू रुग्णालयात मृत पावलेल्यांना न्याय मिळवण्यासाठी जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्न संतप्त कुटुबीयांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा: 'आम्ही ऑक्‍सिजन देणार नाही, तुमची सोय तुम्हीच करा'; जिल्हा प्रशासनाची खासगी रुग्णालयांना अट

मदतीकडे पाठ

नाशिक येथील घटनेनंतर ज्याप्रकारे यंत्रणा कामी लागून रुग्णालयाला भेटी देत तत्काळ मदत देण्यात आला. त्याप्रकारची कुठलीही यंत्रणा सोबतच क्षेत्रातील पालकमंत्री, आमदार, खासदार यांनी देखील पीडित कुटुंबीयांकडे पाठ केल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ