esakal | धक्कादायक! ऑक्सिजन मास्क फेकून कोरोनाग्रस्तांचं रुग्णालयातून पलायन; परिसरात कोरोना संसर्गाची भीती

बोलून बातमी शोधा

corona

धक्कादायक! ऑक्सिजन मास्क फेकून कोरोनाग्रस्ताचं रुग्णालयातून पलायन; परिसरात कोरोना संसर्गाची भीती

sakal_logo
By
अथर्व महांकाळ

नागपूर : कोरोनाचा हाहाकार संपूर्ण देशात सुरु आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेकांचा कोरोनामुळे जीवही गेला आहे.नागपुरात दिवसभरात हजारो नागरिक कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. त्यात रेमडेसिव्हीर, ऑक्सिजन, बेड्स या गोष्टींचा तुटवडा निर्माण झाल्यानं रुग्णांचे हाल होत आहेत. यात भर म्हणून नागपुरातील शासकीय रूग्णालय मेयोमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

हेही वाचा: चंद्रपुरात कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांच्या नशिबी पाणीही नाही; ऐन उन्हाळ्यात वॉटर ATM बंद

सध्या नागपुरातील मेडिकल आणि मेयो या रुग्णालयांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण भरती आहेत. यातील एका रुग्णांनं चक्क ऑक्सिजन मास्क फेकून देऊन मेयोतून पलायन केलं आहे. सोमेश्वर नामदेवराव फुटाणे असं या रुग्णाचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमेश्वर फुटाणे हे गेल्या काही दिवसांपासून मेयो रुग्णालयात भरती होते.. श्वसनाला त्रास होत असल्यामुळे त्यांना ओक्ससीजन लावण्यात आलं होतं. मात्र काल म्हणजेच २१ एप्रिलपासून ते आपल्या बेडवरुन बेपत्ता आहेत. विशेष म्हणजे ते कुठे गेलेत याबाबत रुग्णालयातील कोणाही कडे काहीच माहिती नाही. यामधून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचं रुग्णांवर लक्ष असतं की नाही? हा सवाल उपस्थित केला जातोय.

फुटाणे अजूनही बेपत्ता

बुधवारपासून बेपत्ता असलेले सोमेश्वर फुटाणे हेअजूनही सापडले नाहीत माहिती मिळतेय. मात्र असं असल्यास त्यांच्यामुळे इतरत्र कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

रुग्णालयाकडून उत्तर नाही

फुटाणे नक्की कुठे गेलेत? त्यांच्या पलायनामागचं कारण काय? याबाबत रुग्णालय प्रशासन तसंच मेयो रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अजय केवलीया यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कुठलंही उत्तर मिळू शकलं नाही.

हेही वाचा: पोलिसांनी मोडले नियम म्हणूनच वाचले 'त्या' १५ जणांचे प्राण; दबंगगिरी दाखवत आणलं ऑक्सिजन

नागरिकांचं सहकार्य नाही?

डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, रुग्णालयातील कर्मचारी हे रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी दिवसरात्र एक करत आहेत. तसंच एकीकडे रुग्णांना बेड न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागत आहे. मात्र बेड मिळूनही काहीं नागरिक योग्य ते सहकार्य करत नाहीये. त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.