देहव्यापाराच्या दलदलीच्या वाटेवर असलेल्या महिलेची सुटका | nagpur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prostitute-Business

देहव्यापाराच्या दलदलीच्या वाटेवर असलेल्या महिलेची सुटका

नागपूर : पतीने केलेल्या उपेक्षेमुळे हतबल झालेली ३० वर्षीय महिलेने वेश्‍याव्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. ती चंद्रपुरातून नागपुरात पोहचली. तिने ऑटोला हात दिला. थेट गंगाजमुनात सोडा, असे म्हणताच चालक गोंधळला. त्याला संशय आल्याने त्याने दामिनी पथकाला फोन लावून माहिती दिली. बसस्थानकाजवळ काही वेळ फिरविल्यानंतर महिला पोलिसांच्या ताब्यात दिले. ऑटोचालक आणि दामिनींच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

गुरूवारी दुपारी ३० वर्षे वयोगटातील महिला मनिषा (काल्पनिक नाव) गणेशपेठ बसस्थानकावर उतरली. नाकी-डोळी छान आणि कपड्यांवरून सधन घरची असल्याची दिसत होती. बाहेर येताच तिने ऑटोला हात दाखविला. ऑटोचालक सुनील भोकरे यांनी ‘कुठे जायचे आहे?’ असा प्रश्‍न विचारताच ‘मला गंगाजमुना-रेडलाईट एरियात सोडा’ असे म्हणाली आणि लगबगीने ऑटोत बसली.

हेही वाचा: सातारा : धूर ओकणारी वाहने रडारवर : ‘आरटीओ’ कडून सात लाख वसूल

सुनील यांना थोडा संशय आला. त्यांनी काही अंतरापर्यंत ऑटो चालविला आणि पाण्याची बाटल्या घेण्याचा बहाणा करीत थेट भरोसा सेलच्या प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक रेखा संकपाळ यांना फोन केला. संशयित महिला असून ती गंगाजमुनात घेऊन जाण्याबाबत म्हणत असल्याचे सांगितले. त्यांनी लगेच दामिनीचे पथक थेट ऑटोचालकाने सांगितलेल्या रस्त्यावर पाठवले. दामिनीचे वाहन दिसताच सुनील यांनी ऑटो थांबविला आणि महिलेला ताब्यात दिले. दामिनी पथकाने महिलेला वाहनात बसविले आणि भरोसा सेलमध्ये आणले.

महिलेची करूण कहाणी

मनिषाच्या आईने दुसरे लग्न केले तर वडिलानेही दुसरा ठाव धरला. दोन वर्षांची असताना मनिषा आणि तिची बहिणी आजीकडे राहू लागल्या. आजीचा मृत्यू झाल्यानंतर दोघ्याही बहिणींनी एकमेकींना आधार दिला. मनिषाचे लग्न झाले आणि पतीसह सुखी संसार सुरू झाला. परंतु, तिच्याच जीवलग मैत्रिणीने तिच्या पतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न केले. त्यामुळे पुन्हा एकाकी झालेल्या मनिषा नैराश्‍यात गेली. तिचा पुरूषांवरील पुरता विश्‍वास उडाला.

हेही वाचा: वर्ग दोन कमी करून एक करण्यासाठी शिबिरे जिल्हाधिकारी यांचा निर्णय

पुन्हा नव्यावे थाटला संसा

चंद्रपुरात राहणाऱ्या अविवाहित प्रमोदला मनिषाची हकीकत कळली. प्रमोद हा केंद्र शासनाच्या एका खात्यात नोकरीला आहे. त्याने तिला पुन्हा नव्याने संसार थाटण्याची विनंती केली. दोघांनी नव्याने संसार थाटला. लग्नाला दोन वर्षे झाले तरीही त्यांना मुलबाळ नव्हते. त्यामुळे मनिषाची चिडचिड व्हायची. कधी-कधी पतीसोबत वादही व्हायचे. परंतु, समजदार असलेल्या प्रमोदमुळे संसार सुरू सुरळित होता.

वेश्‍याव्यसाय करण्याचा निर्णय

प्रमोद आणि मनिषात असाच ११ नोव्हेंबरला वाद झाला. पतीच्या कमाईवर जीवन जगत असल्याचे तिच्या डोक्यात बसले. त्यामुळे रागाच्या भरात तिने गंगाजमुनात जाऊन वेश्‍याव्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. ती थेट नागपुरात पोहचली आणि गंगाजमुनाची वाट धरली. ऑटोचालक सुनील भोकरे हा देवाच्या रुपात मिळाला. त्याच्या आणि दामिनीच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

...आणि ती ढसाढसा रडायला लागली

भरोसा सेल प्रभारी रेखा संकपाळ आणि दामिनी पथकातील ललिता उन्हाळे, अनिता वरकडे, गुंजन रामटेके यांनी तिची आस्थेने विचारपूस केली. तिच्या पती आणि बहिणीला बोलावून घेतले. भरोसा सेलमध्ये येताच त्यांना मनिषाने घेतलेला निर्णय सांगितला. शब्द कानी पडताच मनिषा, तिचा पती आणि बहिण तिघेही ढसाढसा रडायला लागले. त्यांनी दामिनी पथकाचे आभार मानले आणि चंद्रपूर गाठले.

loading image
go to top