Cotton Sale Registration Deadline Extended Following High Court Directive
sakal
नागपूर
राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा! 'कापूस खरेदी केंद्रांवरील विक्री नोंदणीला मुदतवाढ', उच्च न्यायालयाचा आदेश..
farmers Relief News Maharashtra High Court: शेतकऱ्यांना दिलासा: कापूस नोंदणीला उच्च न्यायालयाची मुदतवाढ
नागपूर : भारतीय कापूस पणन महामंडळाने (सीसीआय) कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांतर्फे होणारी नोंदणी प्रक्रिया ३१ डिसेंबर २०२५ पासून बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली असून १६ जानेवारीपर्यंत ही नोंदणी सुरू ठेवण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे, नाताळ सुटीदरम्यान या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेत राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

