

Setback for Republican Politics in Nagpur Civic Body, What Went Wrong?
sakal
-केवल जीवनतारे
नागपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे ‘मॉडेल'' असलेला रिपब्लिकन पक्ष बलशाली बनवण्यापेक्षा रिपब्लिकन नेत्यांना आपली वैयक्तिक राजकीय पोळी शिजवण्यात रस असल्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत रिपाइंच्या बॅनरखाली निवडणूक लढवण्यासाठी कोणत्याही गटाने मायक्रो प्लॅनिंग केले नाही. कधीकाळी लाखाच्या घरात दिसणारे मताधिक्य साडेचार हजारावर आले. रिपाइंच्या स्वार्थी नेतृत्वामुळेच रिपब्लिकन ‘व्होट बॅंक''ला खिंडार पडले आहे. तर एकसंघपणे लढण्यासाठी केलेला रिपब्लिकन फेडरेशनचा प्रयोगही फसला.