
Resident Doctors
Sakal
नागपूर : रात्र झोपण्यासाठी तर दिवस काम करण्यासाठी असतो. मात्र, देशभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टर अक्षरशः दिवस-रात्र काम करतात. १८-१८ तास रुग्णसेवेत असतात. त्यामुळे कामाचा तणाव येतो. तणावमुक्तीचा सल्ला देणाऱ्या प्राध्यापकांचाही निवासी डॉक्टरांवर नेहमीच दबाव असल्याचा निष्कर्ष महिनाभरात हेल्पलाइनवरील तक्रारींतून पुढे आला आहे.