दहावीला शाळेत पहिला नंबर आला, विद्यार्थीनीचा सत्कार करायला घरी गेले; कौतुक करतानाच शिक्षकाचा मृत्यू

teacher dies during felicitation गुणवंत विद्यार्थ्यांचा घरोघरी जाऊन सत्कार करण्यात येत असतानाच एका सेवानिवृत्त शिक्षकाचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झालाय. बल्लारपूर तालुक्यात घडलेल्या या घटनेनं हळहळ व्यक्त केली जातेय.
Retired Teacher Dies While Honoring School Topper

Retired Teacher Dies While Honoring School Topper

Esakal

Updated on

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा घरोघरी जाऊन सत्कार करण्याची परंपरा जपताना एका सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाला. ही हृदय हेलावणारी घटना बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे शुक्रवारी (ता. ८) सायंकाळी घडली. विनायक महादेव काळे (वय ६०, रा. तुकडोजी चौक, विसापूर) असे मृत शिक्षकाचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com