उष्माघाताने सीताबर्डीत रिक्षाचालकाचा मृत्यू; नागपूरचा पारा ४३.२ अंशांवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sunstroke

विदर्भातील उन्हाच्या तीव्र लाटेने मंगळवारी आणखी एक बळी घेतला. ऊन सहन न झाल्याने सीताबर्डी परिसरात एका अनोळखी रिक्षाचालकाचा मृत्यू झाला.

उष्माघाताने सीताबर्डीत रिक्षाचालकाचा मृत्यू; नागपूरचा पारा ४३.२ अंशांवर

नागपूर - विदर्भातील (Vidarbha) उन्हाच्या तीव्र लाटेने मंगळवारी आणखी एक बळी (Death) घेतला. ऊन सहन न झाल्याने सीताबर्डी परिसरात एका अनोळखी रिक्षाचालकाचा (Rickshaw) मृत्यू झाला. दरम्यान, उन्हाची लाट कायम असून, बहुतांश जिल्ह्यांमध्ये आजही उन्हाचे तीव्र चटके जाणवले.

राजस्थान व आजूबाजूच्या राज्यांतून उष्ण वारे येत असल्यामुळे विदर्भात सध्या उन्हाची लाट सुरू आहे. अपवाद वगळता सर्वच जिल्ह्यातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. सोमवारी जागतिक तापमानात सहाव्या स्थानावर राहिलेले अकोला आजही विदर्भात हॉट होते. येथे मंगळवारी ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्याखालोखाल ४४.५ अंश सेल्सिअसची नोंद वर्धा येथे झाली. नागपुरातही सलग तिसऱ्या दिवशी तापमान ४३ च्या वर नोंदले गेले. ब्रम्हपुरी (४४.२ अंश सेल्सिअस), चंद्रपूर (४४.२ अंश सेल्सिअस), यवतमाळ (४४.२ अंश सेल्सिअस) आणि वाशीम (४४.० अंश सेल्सिअस) येथेही उन्हाचे जोरदार चटके जाणवले.

यंदा तापत असलेला उन्हाळा नागपूरकरांसाठी जीवघेणा ठरत आहे. शहरातील बर्डीस्थित आनंद टॉकीजजवळील मेट्रो पिल्लरच्या खाली अंदाजे ४० ते ४५ वयोगटातील सायकल रिक्षाचालक मृतावस्थेत आढळून आला. त्याचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. विदर्भात आणखी एक-दोन उन्हाची लाट राहणार आहे. त्यानंतर बंगालच्या उपसागरातील असनी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

Web Title: Rickshaw Driver Death By Heatstroke

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :deathdriverRickshaw
go to top