रिपाइंचा हात आणि साथ कुणाला? काँग्रेस-भाजप सक्रिय

रिपब्लिकन पक्षाच्या गटांना विविध पक्षांनी गोंजरणे सुरू केले आहे
Nagpur Municipal Corporation
Nagpur Municipal CorporationNagpur Municipal Corporation

नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीत (Municipal Corporation Election) अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी रिपब्लिकन (Ripai) पक्षाच्या गटांना विविध पक्षांनी गोंजरणे सुरू केले आहे. यात काँग्रेस (Congress) आणि शिवसेना आघाडीवर आहे. राष्ट्रवादीकडूनही प्रयत्न सुरू असून भाजपने अनेक गटांना यापूर्वीच हाताशी धरले आहे.

शहरात कवाडे, कुंभारे, आठवले, शेंडे, गवई, आंबेडकर या प्रमुख नेत्यांच्या गटांसह रिपब्लिकन समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक संघटना आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत सर्वच गट सक्रिय होतात. बहुजन समाज पार्टी नागपूर महापालिकेत अस्तित्व ठेवून आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे अनेक गटांचे नुकसान झाले आहे. तुलनेत प्रचंड मोठा प्रभाग आणि ताकदीच्या उमेदवारांची संख्या कमी असल्याने अनेक गटांना मोठ्या पक्षासोबत हातमिळवणी करावी लागत आहे.

Nagpur Municipal Corporation
Reel लाइफमध्ये संस्कारी बहू तर Real मध्ये देतात बोल्डनेसला टक्कर

भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) उमेदवारी देताना वाटा देतात मात्र त्यांच्या पक्ष चिन्हावर लढण्याची अट घातली जाते. त्यामुळे गटांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. त्यामुळे यंदा पुन्हा बेकी सोडून एकीने लढण्यावर चिंतन सुरू झाले आहे. मात्र, कोणाचाच कोणावर विश्वास नसल्याने केवळ चर्चा आणि बातम्या पुरती एकी होत असल्याचा आजवरचा अनुभव आहे.

महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. तीन प्रभागाचा निर्णय आधीच झाला आहे. आता फक्त प्रारूप आराखडा जाहीर व्हायचे बाकी आहे. त्यामुळे विविध पक्ष व संघटनांच्या बैठकांना जोर आला आहे. आपली ताकद दाखवण्याची प्रयत्न सुरू झाला आहे. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रमुख प्रा. जोगेंद्र कवाडे यांचेही विविध गटांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न चालले आहेत. त्यांनी ‘ब्रदरहुड’ ही संकल्पना सुरू केल्याने रिपब्लिकनचे दोन मोठे गट मैदानात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Nagpur Municipal Corporation
सोशल मीडियावर सुपरस्टार आहेत सेलिब्रिटींची मुले

आघाडीचे निमंत्रक संजय पाटील, दिनेश अंडरसहारे, सागर डबरासे, घनश्याम फुसे, शेषराव गणवीर, राजेंद्र टेंभुर्णे, संजय जीवने आदींनी समविचारी गटांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. भाकप, विदर्भवादी पक्ष व संघटनांना आघाडीत सहभागी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सद्यःस्थितीत निम्म्या जागा लढवण्याची तयारी आहे. या महिन्याच्या अखेरीस मेळाव्यातून निवडणुकीचा बागूल फुंकण्यात येईल, असे सांगण्यात येते.

भाजपला (BJP) महापालिकेतील सत्ता कायम ठेवायची आहे तर काँग्रेसला (Congress) पुन्हा सत्तेत परतायचे आहे. रिपाइ संघटनांच्या पाठिंब्याशिवाय ते शक्य नाही. त्यामुळे रिपाइला सोबत घेण्यासाठी काँग्रेस अधिक सकारात्मक आहे तर भाजपच्यावतीने ते स्वतंत्र लढावे यादृष्टीने व्यूहरचना आखल्या जात आहे. अशा परिस्थितीत रिपब्लिकन गट, वंचित, बसप आणि आप कशी लढत देतात व कुणाला ‘डॅमेज’ करतील, याचा अंदाज घेणे सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com