
What Are The Symptoms Of Heat Or Summer Allergies: अॅलर्जी ही एक वेगळ्या प्रकारची समस्या आहे. प्रारंभी गंभीर वाटत नसली तरी रुग्णांसाठी ती खूप धोकादायक आहे. हवामान बदलणे, उन्हाच्या संपर्कात येणे, औषधे खाणे किंवा काही गोष्टी खाल्ल्यानंतर विचित्र अस्वस्थता जाणवते. मात्र, अलीकडे उकाडा वाढल्यामुळे मेडिकलसह मेयोतील बाह्यरुग्ण विभागात ॲलर्जी रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. दर दिवसाला रुग्णांची संख्या 300 ने वाढली आहे. यामुळे मेडिकलच्या बाह्यरोग विभागातील एकूण संख्या चार हजारावर पोचली आहे.