
अपघातात बापलेकांचा मृत्यू; महिला पोलिसामुळे आरोपी अटकेत
भिवापूर (जि. नागपूर) : उमरेडच्या दिशेने भरधाव जात असलेल्या खासगी बसने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला जबर धडक (Road Accident) दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार बापलेकांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. २६) सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास साई समर्थ पेट्रोल पंपाजवळ घडली. मच्छिंद्र श्रीहरी मालोदे (३५) व सानिध्य ऊर्फ कृष्णा मच्छिंद्र मालोदे (६) दोन्ही रा. काकेपार ता. पवनी, जि. भंडारा अशी मृतांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बापलेक एमएच ४०, एडी २८८७ क्रमांकाच्या दुचाकीने उमरेड येथून भिवापूरच्या दिशेने जात होते. एमएच ४९, एटी ५२५३ ही खासगी बस भिवापूरवरून नागपूरच्या दिशेने भरधाव जात होती. बसने समोरून येत असलेल्या दुचाकीला जबर धडक दिली. अपघातानंतर बस चालक फरार झाला.
हेही वाचा: राणेनंतर भाजपच्या ‘या’ नेत्याने अपशब्दात मुख्यमंत्र्यांना खडसावले
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी बापलेकांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत (Father and son Died) घोषित केले. पोलिसांनी बस चालकाविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात असून, पुढील तपास सुरू आहे.
बसमध्ये प्रवास करीत होती महिला पोलिस
बापलेकांना धडक देणाऱ्या बसमध्ये येथील पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस कर्मचारी मंगला जाधव प्रवास करीत होत्या. अपघातानंतर चालक बस घेऊन पळून जात असल्याचे लक्षात येताच त्यांनी लगेच साहाय्यक पोलिस निरीक्षक शरद भस्मे यांना मोबाइलवरून अपघाताची माहिती दिली. प्रसंगावधान राखत त्यांनी चालकाला बस उमरेड पोलिस ठाण्यात लावण्यास भाग पाडले. मंगला जाधव यांच्या सतर्कतेने चालकाला अटक करण्यात पोलिसांना (accuse arrested) यश आले.
Web Title: Road Accident Father And Son Died Crime News Nagpur Rural
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..