
नागपूर : दोन मुलांना रेल्वेत ठेवून पाणी भरण्यासाठी स्थानकावर उतरणाऱ्या महिलेची गाडी सुटली. मुले गाडीत आई स्थानकावर अशी स्थिती असताना आईची धडधड वाढली. मात्र, रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ)च्या जवानांनी तत्परता दाखवीत मुलांना नागपूर स्थानकावर शोधून सुखरूप आईच्या स्वाधीन केले.