
नागपूरच्या कामठी रोडवरील एडन ग्रीन्स रिसॉर्ट येथे रविवारी मध्यरात्री झालेल्या ‘फ्रेंड्स अँड बियॉंड’ फ्रेंडशिप डे पार्टीत मोठा हंगामा झाला. दोन गटांमधील वादाने राजकीय रंग घेतला असून, आयोजकाने थेट पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव घेऊन पोलिसांना धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे हा विषय चर्चेचा ठरला आहे.