Rudrastra UAV : संरक्षण दलाच्या ताफ्यात नागपूर मेड ‘रुद्रास्त्र यूएव्ही’; नागपुरातील सोलारच्या ड्रोनची पोखरण येथे चाचणी
Solar Defence : सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडने विकसित केलेल्या ‘रुद्रास्त्र’ यूएव्हीची पोखरण फायरिंग रेंजवर यशस्वी चाचणी घेण्यात आली. हायब्रिड व्हर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग (व्हीटीओएल) तंत्रज्ञानासह, ड्रोनने अचूक लक्ष्य भेदले.
नागपूर : भारताने संरक्षण तंत्रज्ञानात आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे. सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडने (एसडीएएल) विकसित केलेल्या हवेतून मारा करणाऱ्या ड्रोनची (यूएव्ही) यशस्वी चाचणी पोखरण येथे घेण्यात आली.