

Strong Performances Highlight Mental Health, Woman Empowerment, Media Influence
Sakal
नागपूर : सुंदर नेपथ्य, उत्तम प्रकाश योजना, स्पर्धकांचा उत्साह, प्रेक्षकांच्या टाळ्या आणि दाद अशा उत्साही वातावरणात पार पडलेल्या ‘सकाळ करंडक’ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘वि.प्र.’ या एकांकिकेने नागपूर विभागीय अंतिम फेरीचे विजेतेपद पटकावले. यासह या एकांकिकेची विदर्भातून स्पर्धेच्या महाअंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. तर सांघिक द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक आर. एस. मुंडले महाविद्यालय संघाच्या ‘काळंभूत’ या एकांकिकेने पटकावले. सांघिक पारितोषिकांसह वैयक्तिक पारितोषिकांचेही यावेळी वितरण करण्यात आले.