esakal | ब्रेकींग - खासदार साक्षी महाराज सरसंघचालकांच्या भेटीला
sakal

बोलून बातमी शोधा

SAKSHI MAHARAJ

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या वादावर बोलताना भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी सोनिया आणि राहुल गांधी हीच काँग्रेसची मुख्य समस्या असल्याचा टोला लगावला. कोरोना निवळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत विश्वगुरु होईल, असा दावाही त्यांनी केला.

ब्रेकींग - खासदार साक्षी महाराज सरसंघचालकांच्या भेटीला

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : साक्षी महाराज आज नागपूरला आले होते. त्यांनी महाल येथील संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अनेक दिवसांपासून सरसंघचालकांचा आशीर्वाद घेण्यास आपण इच्छुक होतो. एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी आज नागपूरला येण्याचा योग आला. त्यामुळे सरसंघचालकांचीसुद्धा भेट झाली. संघाच्या विचाराने आपण राजकारणात आलो. संघ पदाधिकाऱ्यांच्या भेटीने वैचारिक प्रेरणा मिळते. कोरोनाच्या संकटकाळात आध्यात्माकडे अनेकजण वळत आहे. ही चांगली बाब आहे.

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या वादावर बोलताना भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी सोनिया आणि राहुल गांधी हीच काँग्रेसची मुख्य समस्या असल्याचा टोला लगावला. कोरोना निवळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत विश्वगुरु होईल, असा दावाही त्यांनी केला.

संकटाचा सामना करण्यासाठी ‘दवा के साथ दुवाओंकी जरुरत होती है’ भारतीय संस्कार आणि जीवनशैली अशा प्रसंगी महत्त्वाची ठरते. त्यामुळेच आपला देश समर्थपणे कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराचा सामना करीत आहे. साक्षी महाराज यांनी नागपूर भेटीत अनेक सामाजिक संघटना व त्यांच्या प्रतिनिधींच्याही भेटी घेतल्या. लोधी महासभाचे उपाध्यक्ष प्रवीण कान्होले, लालसिंह ठाकूर, मोरेश्वर कुमेरिया यांच्याशी महाराजांनी चर्चा केली.

संपादन - स्वाती हुद्दार

loading image
go to top