

Mahar Regiment soldiers paying tribute to Bhima Koregaon martyrs at Deekshabhoomi in Nagpur.
sakal
नागपूर: शौर्य, सहनशक्ती आणि समृद्ध ऐतिहासिक परंपरा ही महार रेजिमेंटची ओळख आहे. ५०० महार सैनिकांनी भीमा कोरेगाव येथील १८१८ सालच्या युद्धात पेशव्यांची सत्ता संपुष्टात आणली. भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त गुरुवारी (ता. १) उपराजधानीतील महार रेजिमेंटच्या दीडशे निवृत्त सैनिकांनी दीक्षाभूमीवर उभारलेल्या भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या प्रतिकृतीला अभिवादन केले.