साळवा (ता.कुही) : राजोला सर्कल अंतर्गत साळवा गावात एका वीस वर्षीय तरुणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता.३) सायंकाळी उघडकीस आली..मिळालेल्या माहितीनुसार, प्रज्ञा उर्फ संचाली संजय गणवीर (वय २०) ही नागपूर येथील आंबेडकर कॉलेजमध्ये बी.एस.सी. द्वितीय वर्षाला होती. तेथेच वसतिगृहामध्ये राहत होती. काही दिवसांपूर्वी तिने वसतिगृहाची खोली सोडली होती. सोमवारी तिचे वडील संजय देवराव गणवीर (वय५०, रा. साळवा, ता. कुही) यांनी तिला नागपूरहून घरी आणले होते..सायंकाळी सुमारे पाच वाजताच्या सुमारास संजय गणवीर व त्यांचा मुलगा लक्की हे साळवा येथील आठवडी बाजारात गेले असता प्रज्ञा घरी एकटी होती. सायंकाळी अंदाजे साडेपाच वाजता ते घरी परतल्यावर घराचे समोरील दार आतून बंद दिसले. आवाज दिल्यानंतर प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी मागील दारातून घरात प्रवेश केला. हॉलमधील छताच्या लाकडी फाट्याला प्रज्ञा हिने पिवळ्या रंगाच्या नायलॉन दोरीने गळफास घेतल्याचे दिसले..त्यानंतर संजय गणवीर यांनी तत्काळ दोर कापून मुलीला खाली उतरवले, परंतु ती बेशुद्ध अवस्थेत होती. आरडाओरड केल्यावर पोलिस पाटील ममता उल्हास मेश्राम, सरपंच नीतेश मेश्राम, तसेच गौतम मेश्राम, राजू काबंळे, कैलास रंगारी, चंद्रमणी ऊके आणि इतर ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले..साळवा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी राजू रघटाडे घटनास्थळी येवुन तपासणी केला असता त्यांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच कुही पोलिस स्टेशनचे ठाणेदार तेथे पोहचले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व प्रज्ञाला ग्रामीण रुग्णालय कुही येथे दाखल केले असता डॉक्टरांनी ती मृत असल्याचे घोषित केले. पुढील तपास ठाणेदार प्रशात काळे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे..Maharashtra Crime : ती असुरक्षितच; साताऱ्यामध्ये महिला डॉक्टरने संपवली जीवनयात्रा, मुंबईमध्ये प्रेयसीला मारत प्रियकराने जीवन संपविले.आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्टप्रज्ञा हिने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वडील संजय गणवीर यांनी दिलेल्या तोंडी अहवालात त्यांनी कोणावरही संशय नसल्याचे नमूद केले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.