नागपूर : बापरे! एकाच दिवशी ९० बाधित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona
नागपूर : बापरे! एकाच दिवशी ९० बाधित

नागपूर : बापरे! एकाच दिवशी ९० बाधित

नागपूर : जूनपासून कोरोना बाधितांची खाली येत असलेला आलेख आज अचानक ९० बाधितांवर पोहोचल्याने खळबळ माजली. सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी वाढलेल्या बाधितांनी नव्या वर्षात कोरोना स्फोटाचे संकेत दिले. यापूर्वी १० जूनला ९१ बाधित आढळले होते. त्यानंतर दैनंदिन बाधितांच्या संख्येत सातत्याने घट झाल्याने दिलासा मिळाला होता. (nagpur corona update)

हेही वाचा: नागपूर जिल्ह्यात महिनाभरात ३४५ कोरोनाबाधित

गेल्या चोविस तासांत जिल्ह्यात ९० कोरोनाबाधित आढळून आले. यात शहरातील ८१ जणांचा समावेश असल्याने निर्बंध आणखी कडक होण्याची शक्यता बळावली आहे. आज ग्रामीणमध्ये ८ बाधित आढळून आले. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या ४ लाख ९४ हजार ४९ पर्यंत पोहोचली. १० जूनपासून बाधितांचा आलेख सातत्याने खाली आला. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले. परंतु ओमिक्रॉनमुळे प्रशासन गंभीर झाले असून चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली. (Nagpur news)

हेही वाचा: नितीन राऊतांच्या सूचनेला केदारांचा विरोध; जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मतभेद उघड

परिणामी बाधितांचा आलेख या महिन्यात सातत्याने वाढत आहे. यातूनच निर्बंध कडक होणार आहे. आज आढळून आलेल्या ९० बाधितांमुळे सक्रिय रुग्णांच्‍या संख्येने अडीचशेचा पल्ला गाठला. जिल्ह्यात आता २७१ सक्रिय रुग्ण आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या सक्रिय रुग्णांमुळे बेड, ऑक्सिजन आदींसाठी प्रशासनाने तत्परता दाखविणे सुरू केले. दरम्यान, आज १८ बाधितांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे आतापर्यंत कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या ४ लाख ८३ हजार ६५६ पर्यंत पोहोचली.

हेही वाचा: नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधित दोन लाखांवर; ३,७१७ बाधित; ४० मृत्यू 

महिनाभरात ४३५ बाधित

महिन्याच्या पहिल्या दिवशी केवळ एक अंकी आकड्याने सुरवात झाली. त्यानंतर १० ते १९ पर्यंत बाधित आढळून आले. परंतु २५ डिसेंबरला २४ बाधित आढळून आले अन् आलेख सातत्याने वाढला. २६ डिसेंबरला ३२, २८ डिसेंबरला ४४, ३० डिसेंबरला २७, काल,३० डिसेंबरला २८ बाधित तर आज ९० बाधित आढळले. त्यामुळे महिनाभरात बाधितांच्या संख्येचा आलेख ४३५ पर्यंत गेला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top