विस्तार अधिकारीपदी पदोन्नतीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास, रुजू होण्याआधी जीवने कुटुंबावर काळाचा घाला

Samruddhi Accident News अकोल्यात नव्या पदावर रुजू होण्यासाठी निघालेल्या जीवने कुटुंबाचा प्रवास समृद्धी महामार्गावरच कायमचा थांबला. धामणगाव रेल्वेजवळील चॅनल क्रमांक १०६ परिसरात भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला.
Samruddhi Accident News

Five Killed in Samruddhi Expressway Tragedy

Esakal

Updated on

साईनाथ सोनटक्के : सकाळ वृत्तसेवा, चंद्रपूर, ता. २८ : घरात पदोन्नतीचा आनंद, नव्या जबाबदारीची स्वप्ने आणि उज्ज्वल भविष्याची आस... मात्र, नियतीने काही वेगळेच लिहून ठेवले होते. अकोल्यात नव्या पदावर रुजू होण्यासाठी निघालेल्या जीवने कुटुंबाचा प्रवास समृद्धी महामार्गावरच कायमचा थांबला. धामणगाव रेल्वेजवळील चॅनल क्रमांक १०६ परिसरात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याने चंद्रपूर शहरावर शोककळा पसरली आहे. Akola Posting Turns into Family Tragedy on Highway

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com