Samruddhi Accident: एका अपघातामुळे वाहतूक थांबवली, कारला मागून आलेल्या ट्रकने धडक दिली; जुळ्या बहिणींसह सहा जणांचा जागीच मृत्यू

Samruddhi Expressway Accident: समृद्धी महामार्गावर कारला ट्रकने मागून धडक दिल्यानं कारमधील चौघांसह ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यात दोन मुलींसह वडिलांचा समावेश आहे. अपघातात कारचा चुराडा झाला असून ट्रकचंही नुकसान झालंय.
Samruddhi Expressway Accident

Samruddhi Highway Accident News

Esakal

Updated on

Samruddhi Expressway Accident: समृद्धी महामार्गवर भरधाव ट्रकनं कारला धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की कारचा चुराडा झाला आहे. कारमधील चौघे आणि ट्रकमधील दोघे गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना बाहेर काढून रुग्णालयात नेण्याआधीच मृत्यू झाला. या अपघातामुळे समृद्धी महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलीस आणि प्रशासनाकडून अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. Samruddhi Accident: Truck Hits Car, Six Killed Including Twins

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com