
Samruddhi Expressway facilities
esakal
समृद्धी महामार्गावर आता १२० ‘पोर्टा केबिन’ अर्थात तात्पुरते शौचालये बांधण्यात आली आहेत. मात्र, आपण काही दिवसांपूर्वीच या मार्गावरून गेलो असता आपल्याला या प्रकारचे एकही शौचालय दिसले नसल्याचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले. तसेच, याचिकाकर्त्याला महामार्गाची पाहणी करण्याचे आदेश देत सोमवारपर्यंत (ता. ८) अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.