

Truck Accident
sakal
कारंजा: समृद्धी महामार्गावरील लोकेशन क्रमांक १९७ वर गुरुवारी (ता.२५) रोजी पहाटे चार वाजताच्या दरम्यान दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. दुरुस्तीसाठी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. संतोष सिंग (वय ३५ वर्ष रा.जनकपूर उत्तरप्रदेश) व सुभाष वाघ (वय २५ वर्ष, रा.मसला जि. बुलडाणा) अशी मृतांची नावे आहेत.