‘समृद्धीला’ आणखी चार महिन्यांचा थांबा; महामार्ग विदर्भासाठी गेमचेंजर ठरेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘समृद्धीला’ चार महिन्यांचा थांबा; विदर्भासाठी गेमचेंजर ठरेल

‘समृद्धीला’ चार महिन्यांचा थांबा; विदर्भासाठी गेमचेंजर ठरेल

नागपूर : बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरून शिर्डीला जाण्यासाठी आणखी चार महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. कोरोनामुळे काम खोळंबल्याने एक मे रोजी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करता आला नाही. मात्र, डिसेंबर महिन्यात तो नक्कीच खुला होईल, असा दावा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. यावेळी त्यांनी हा केवळ महामार्ग नसून विदर्भ, मराठवाड्याच्या विकासासाठी गेमचेंजर ठरेल असा विश्वास व्यक्त केला.

शिंदे यांनी शुक्रवारी समृद्धी महामार्गाची पाहणी केली. यावेळी पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी थोडा विलंब होत असला तरी प्रकल्पाच्या खर्चात फारशी वाढ होणार नाही असे सांगितले. आतापर्यंत जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. जागा अधिग्रहणाची समस्या संपली आहे. शिर्डीपर्यंत ५०० किलोमोटर लांबीचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. या मार्गावरून नागपूरवरून मुंबई अवघ्या सात ते आठ तासात गाठता येणार आहे. मुंबईच्या जेएनपीटी बंदरापर्यंत तो जाणार असल्याने अनेक उद्योग विदर्भात येतील. पूर्वी मुंबई, पुणे फारफार तर औरंगाबादच्या पुढे उद्योजक येत नव्हते, असे ते म्हणाले.

हेही वाचा: संभाजीराजे हे कायद्यापेक्षा मोठे आहेत का? तातडीने अटक करा

गडकरींच्या पत्रावर बोलताना शिंदे यांनी आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केल्याचे सांगितले. महामार्गाच्या कामात अडथळे आणण्यावर कारवाई केली जाणार आहे. समृद्धी महामार्गाचे काम कोणी रोखत असल्याची तक्रार आपल्याकडे केली नसल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल, आमदार अभिजित वंजारी, किरण पांडव आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले

  • नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनबाबत माहीत नाही

  • समृद्धी महामार्गावर सौर ऊर्जेद्वारे २५० मेगावॅट वीज निर्मिती

  • २० नवे स्थानके विकसित करणार

Web Title: Samruddhi Highway Wait Another Four Months Game Changer For Vidarbha Eknath Shinde

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Eknath Shinde