Sana Khan Muder Case : तीन आठवड्यांची शोध मोहीम अखेर थांबली, मृतदेहाशिवाय...

अकरा ऑगस्टला अमित शाहूसह रमेश सिंग या दोघांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान आरोपींनी पोलिसांना सना यांचा मृतदेह हा हिरण नदीत फेकल्याची माहिती दिली होती
Sana Khan Murder Case
Sana Khan Murder Casesakal

नागपूर - तीन आठवड्यांपासून पोलिस भाजप पदाधिकारी सना खान यांच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत.पण त्यांचा मृतदेह सापडलेला नाही. त्यामुळे जबलपूरला शोध मोहिमेसाठी गेलेले नागपूर पोलिसांचे पथक नागपूरला परतले असल्याची माहिती आहे.

सना खान २ ऑगस्टला जबलपूरला अमित शाहू याच्या भेटीसाठी रवाना झाल्या होत्या. त्यानंतर सकाळी मुलाशी बोलून दुपारी त्यांचा फोन बंद झाला होता. त्यानंतर सना यांच्या आईने मानकापूर पोलिसांत बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली. (Sana Khan Muder Case)

Sana Khan Murder Case
Mumbai Local News : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात पादचारी पुलाची रखडपट्टी तूर्तास झाली दूर !

अकरा ऑगस्टला अमित शाहूसह रमेश सिंग या दोघांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान आरोपींनी पोलिसांना सना यांचा मृतदेह हा हिरण नदीत फेकल्याची माहिती दिली होती. तेव्हा पासून सतत पोलिस पथक मृतदेह शोधत आहेत. यादरम्यान पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली.

याशिवाय ३०० किलोमीटर दूर एका विहिरीत सापडलेला संशयित मृतदेहही ताब्यात घेतला. विशेष म्हणजे, पोलिसांना सहआरोपी धर्मेंद्र सिंग याने मृतदेह नदीत फेकून देत, बॅग तिथेच ठेवल्याचे सांगितले.

Sana Khan Murder Case
Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करत असाल तर थांबा, अन्यथा तुमचा 3 तास वेळ वाया जाऊ शकतो!

त्यावरून पोलिसांनी बॅग आणि एक मोबाईलही जप्त केला. दुसरीकडे तीन आठवड्यांपासून पोलिसांकडून हिरण आणि नर्मदा नद्यांच्या आसपासच्या भागात शोध सुरू आहे.

आरोपींनी दिलेल्या माहितीवर तपास सुरू केले. मात्र, पोलिसांना मृतदेह शोधण्यात यश आले नाही.

सध्या मुख्य आरोपी पप्पू ऊर्फ अमित साहू, रमेश सिंग, धर्मेंद्र यादव, रब्बू चाचा उर्फ रविशंकर यादव आणि कमलेश पटेल हे पोलिस कोठडीत असल्याने तपास सुरू आहे. शोध मोहिमेचा अयशस्वी निष्कर्ष तपासाला धक्का देणारा आहे.

Sana Khan Murder Case
Mumbai Local News : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात पादचारी पुलाची रखडपट्टी तूर्तास झाली दूर !

धरणाचे पाणी थांबविले, आपत्ती निवारण पथकाचाही शोध

सना खान यांचा मृतदेह हा नदीत फेकल्याचे आरोपींनी सांगताच, पोलिसांनी मध्यप्रदेश प्रशासनाच्या मदतीने नर्मदा नदीवरील धरणाचे पाणीही थांबविले. याशिवाय राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या मदतीने नदीत चार ते पाच किलोमीटरपर्यंत मृतदेहाचा शोध घेतला. मात्र, त्यानंतरही पोलिसांच्या हाती अपयश आले आहे.

मृतदेह महत्त्वाचाच

सना खानचा मृतदेह सापडणे हा आरोपींविरुद्ध खुनाचा खटला चालविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तिचा मृतदेह सापडल्याशिवाय हे प्रकरण न्यायालयात तग धरणार नाही, असा कयास कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने या पैलूचे महत्त्व सांगून फौजदारी कारवाईत पुराव्याचे महत्त्व अधोरेखित केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com