Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करत असाल तर थांबा, अन्यथा तुमचा 3 तास वेळ वाया जाऊ शकतो!

चालकांना सतावतेय अपघाताची भीती
Mumbai-Goa National Highway Road Accident
Mumbai-Goa National Highway Road Accidentesakal
Summary

मुंबई-गोवा महामार्गाची दुर्दशा झाली आहे. खड्डेमय रस्त्यातून वाट काढणे चालकांना जिकरीचे झाले आहे.

रोहा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Goa Highway) ठिकठिकाणी पडलेल्‍या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून प्रवासी व वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत.

Mumbai-Goa National Highway Road Accident
NCP Crisis : राष्ट्रवादीचा नाराज गट अजित पवारांच्या लागला गळाला? शरद पवारांच्या दौऱ्यात नाराजी उघड

पावसाळ्यात महामार्गावर पडणारे खड्डे ही दरवर्षीची समस्‍या झाली असून दैनंदिन प्रवास करणारे नागरिक, चालकांना अपघाताची (Road accident) भीती सतावते. खड्डे वाचवण्याच्या नादात वाहनांचा वेग मंदावत असल्‍याने वाहतूक कोंडी होत असल्‍याचेही दिसून येत आहे.

Mumbai-Goa National Highway Road Accident
Solapur Politics : 83 वर्षाच्या योद्ध्याची नेत्यांना धास्ती; पवारांच्या 'या' खेळीचा अंदाज कोणालाच लागत नाही, दिग्गजांना चिंता

यामुळे वेळ व पैसा नाहक खर्च होत आहे. एक तासाच्या प्रवासासाठी अडीच ते तीन तास वेळ लागतो. त्‍यामुळे विशेषतः लहान मुले, महिला, ज्‍येष्‍ठ नागरिकांची गैरसोय होते. खड्डेमय मार्गातून जाताना हेलकावे खात जावे लागत असल्‍याने आरोग्‍याच्या व्याधी बळावल्‍या असून वाहनेही निदुरुस्‍त होत असल्‍याचे चालकांकडून सांगण्यात येत आहे.

मुंबई-गोवा महामार्गाची दुर्दशा झाली आहे. खड्डेमय रस्त्यातून वाट काढणे चालकांना जिकरीचे झाले आहे. प्रशासनाने गणेशोत्सवापूर्वी महामार्ग खड्डेमुक्त करावा.

-नंदकुमार मरवडे, प्रवासी, खांब-कोलाड

Mumbai-Goa National Highway Road Accident
Health News : श्रावणात 'या' पालेभाज्या खात असाल तर वेळीच सावध व्हा, अन्यथा आरोग्यावर होईल मोठा परिणाम!

एक तपाहून अधिक काळ नादुरुस्त रस्ताचा त्रास कोकणवासी भोगत आहेत. गणेशोत्‍सवात लाखोंच्या संख्येने भाविक गावात दाखल होतात. खड्ड्यातून मार्ग काढताना अनेक वाहने नादुरुस्‍त होतात. शिवाय पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी सारखे आजार बळावतात. गणेशोत्सव पूर्वी प्रशासनाला खड्डे बुजविण्याची बाप्पा सद्‌बुद्धी देवो

- शाम लोखंडे, वाहनचालक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com