esakal | दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विदर्भाचा झेंडा, नागपूरकर सांची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

बोलून बातमी शोधा

sanchi jivane

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विदर्भाचा झेंडा, नागपूरकर सांची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : भारतीय चित्रपटांचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जयंतीप्रीत्यर्थ दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात विदर्भातील कलावंतांनी लक्षवेधी कामगिरी केली आहे. नागपूरच्या कलावंत सांची जीवने यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच, उत्कृष्ट एडिटिंग पारितोषिक कामठी येथील नितीन काळबांडे (माहितीपट : स्वल्पविराम) आणि ज्युरी मेंशन डॉकुमेंट्री म्हणून अमरावती येथील वैशाली केंदळे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'इंवेस्टींग लाइफ (माहितीपट)' ला प्राप्त झाला आहे.

हेही वाचा: सावधान! 'या' शहरात फक्त एक नव्हे तर ५ नवीन स्ट्रेन, लक्षणात बदल

महोत्सवाचे हे ११ वे वर्ष असून पारितोषिकांची नुकतीच घोषणा करण्यात आली. यूएसए, स्वित्झर्लंड, स्पेन, कॅनडा, युके, तुर्की, चीन, जर्मनी, भारत आणि इतर काही देशांमधून ३१० चित्रपटांचा अंतिम नामांकनामध्ये समावेश होता. नागपूर येथील व्हीएमव्ही कॉलेजमध्ये सांची सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. नागपूर येथे गतवर्षी निर्मित 'पैदागीर' या मराठी चित्रपटातील प्रमुख भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे.

याआधी फिल्म डिव्हिजनचा सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपटाचा पुरस्कार देखील या चित्रपटाला मिळाला आहे. याशिवाय विविध चित्रपट महोत्सवांमध्ये चित्रपटास पुरस्कार आणि नामांकने मिळाली आहेत. पैदागीर या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक संजय जीवने असून गतवर्षी नागपूर येथील कलावंतांना घेऊन सम्मा दिठ्ठी फिल्म्सने पैदागीर चित्रपटाची निर्मिती केली हे विशेष. तर, नितीन काळबांडे दिग्दर्शित आणि मोरोती मुरके निर्मित 'स्वल्पविराम' माहितीपट गोवारी समाजावर भाष्य करणारा आहे. तर, इंवेस्टींग लाइफ या माहितीपटाची निर्मिती फिल्म डिव्हीजन मुंबईने केली आहे.